Search This Blog

Friday, 16 August 2024

19 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन

19 ऑगस्ट रोजी  महिला लोकशाही दिन

चंद्रपूर, दि. 16 : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर व चवथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. ऑगस्ट  महिन्याचा तिसरा सोमवार दि.19 रोजी असून या दिवशी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

               सदर महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक, आस्थापने विषयक बाबी, व विहीत अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार /निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असतील अशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसांपूर्वी जिल्हा  महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरिय महिला  लोकशाही दिनास प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठवून प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात येईल, तसेच विहीत अर्जाचा नमुना मिळविण्यासाठी  कार्यालयाला भेट द्यावी, असे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment