Search This Blog

Friday 2 August 2024

कापूस साठवणूक बॅग व फवारणी पंप करीता महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन


 कापूस साठवणूक बॅग व फवारणी पंप करीता महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 2 : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस,  सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत कापूस पिकातील मूल्य साखळीस चालना देणे या उद्देशाने कापूस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सन 2024-25 चालू खरीप हंगाममध्ये खालील कापूस साठवणूक बॅग व बॅटरी संचालित फवारणी पंप पुरविण्यात येणार आहेत.

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस योजना अंतर्गत कापूस साठवणूक बॅग ( बॅग प्रति हेक्टर8) वरील लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. चालू खरीप हंगाममध्ये बॅटरी संचालित फवारणी पंप सोयाबीन आणि बॅटरी संचालित फवारणी पंप कापूस पुरविण्यात येणार आहेत.

त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कृषी यांत्रीकीकरण या टाईल अंतर्गत शेतक-यांना अर्ज करता येतील. कापूस साठवणूक बॅग 100 टक्के अनुदानावर असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी mahadbt.maharashtra.gov.infarmerlogin या  वेबसाईड वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.            

००००००

No comments:

Post a Comment