Search This Blog

Thursday 29 August 2024

मच्छिमार, मत्स्यसंवर्धक ,मत्स्य कास्तकारांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

 

मच्छिमारमत्स्यसंवर्धक ,मत्स्य कास्तकारांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा

Ø 14 घटकांसाठी कर्जदर निश्चित

चंद्रपूरदि. 29 : मच्छीमारमत्स्यसंवर्धकमत्स्य कास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून   सन 2024-25 या वर्षांकरतिा राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे.         

            सर्वजाती मत्स्यपालनकरीता प्रति हेक्टर शेततळे 5 लाख रुपये कर्ज दर निश्चित करण्यात आला आहे. नदीतलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने मासेमारी 80 हजार रुपयेनिमखारे पाण्यातील सर्वजाती मत्स्यपालन प्रति हेक्टर 3 लाख रुपये,  निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रति हेक्टर 3 लाख रुपये, टॉलर मच्छीमार नौका 3 लाख रुपये,  पर्सिसीन मच्छीमार नौका 3 लाख रुपयेगील नेटर मच्छीमार नौका 3 लाख रुपयेबिगर यांत्रिक मच्छीमार नौका 80 हजार रुपयेयांत्रिक मच्छीमार नौका 1 लाख 50 हजार रुपयेशोभीवंत मत्स्यपालन 1 लाख रुपयेगोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय 2 लाख रुपये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन 50 हजार रुपये अशा एकूण 14 घटकांना कर्जदर निश्चित करण्यात आलेला आहे.

            राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमारमत्स्यसंवर्धक ,मत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा  लाभ घेण्यासाठी जिल्हयाचे सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे मत्स्यव्यवसाय विकास विभागाने कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment