Search This Blog

Monday 19 August 2024

सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरतीकरिता 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज आमंत्रित


सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरतीकरिता 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि. 19 :  जिल्हा परिषदचंद्रपूर अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरती करायची आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने पदे भरण्याबाबत शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांमधुन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर नियुक्ती करण्याकरिता दिनांक 17 ते 21 ऑगस्ट 2024 अखेर कार्यालयीन वेळेत आवेदन पत्रशिक्षण विभाग (प्राथ.) जिल्हा परिषदचंद्रपूर या कार्यालयात मागविण्यात येत आहे. विस्तृत जाहिरातअर्जाचे नमुने व इतर प्रारुप www.zpchandrapur.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेतअसे शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment