नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
चंद्रपूर, दि. 1 जूलै : चंद्रपूर-दाताळा रस्त्याला जोडणाऱ्या पुलाचे काम चालू असून सद्यस्थितीत पुलाच्या बाजूने नवीन रस्ता तयार करून वाहतूक सुरू आहे. चंद्रपूर कडील नवीन पुलाचे काम करण्याकरिता पुलाखालून जाणारी वाहतूक बंद केल्या खेरीज पुलाचे काम करणे शक्य नाही. तसेच भविष्यात पावसाळ्यातील पुरामुळे केव्हाही सदरचा रस्ता बंद पडू शकतो. जनतेला त्रास व असुविधा होवू नये तसेच कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता पर्यायी मार्ग निश्चित केला आहे.
दाताळा-चंद्रपूर मार्ग पावसाच्या पुरामुळे बंद पडल्यास दाताळाकडून चंद्रपूरकडे जाणारी वाहतुक आयटीआय चौक दाताळा येथून एमआयडिसी फाटा ते पडोली फाटा ते नागपुर रोडने चंद्रपूर कडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा.
पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment