Search This Blog

Wednesday, 1 July 2020

मूल तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र मोझेस लेआउट वार्ड क्रमांक 14 पूर्ववत सुरू


मूल तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र
मोझेस लेआउट वार्ड क्रमांक 14 पूर्ववत सुरू
चंद्रपूर,दि.1 जुलै: मूल तालुक्यातील मोझेस लेआउट वार्ड क्रमांक 14 मध्ये कोरोना बाधित आढळून आला होता. त्याचा प्रादुर्भाव गावातील इतर भागांत पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच  प्रभागातील नागरिकांचे हित  व सुरक्षेसाठी उपाययोजना म्हणून सदर भाग प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेनमेंट झोन घोषित केला होता. या कंटेनमेंट झोनमध्ये नवीन कोरोना बाधित आढळून आला नाही तसेच या कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोझेस लेआउट वार्ड क्रमांक 14 पूर्ववत सुरू झालेला आहे,अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा सब डिव्हिजनल इन्सिडेंट कमांडर एम.खेडकर यांनी आदेश काढून दिली आहे.
वैद्यकीय अधीक्षक जिल्हा ग्रामीण रुग्णालय, मूल यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मोझेस लेआऊट, वार्ड क्रमांक 14 तालुका मुल या भागात इतर कोणतीही कोरोना बाधित आढळून न आल्याबाबत केलेल्या अहवालानुसार या भागातील प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राच्या सीमा पूर्ववत सुरु करण्यात आलेल्या आहेत.
00000

No comments:

Post a Comment