Search This Blog

Tuesday 26 July 2022

अनुसूचित जमातीच्या योजनांसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित

 

अनुसूचित जमातीच्या योजनांसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 26 जुलै : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विविध योजनांसाठी महिला व पुरुष गटांकडून 27 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 पर्यंत (सुट्टीचे दिवस सोडून)अर्ज मागविण्यात येत आहे.

यात अनुसूचित जमातीच्या समूह / बचत गटाद्वारे पिंजरा पध्दतीने मत्स्य संवर्धन करण्यासाठी मासोळी बीज आणि मासोळी संरक्षणासाठी साहित्य सामुग्री खरेदीकरीता 85 टक्के अनुदानावर आर्थिक सहाय्य देणे, अनुसूचित जमातीच्या समुह / बचत गटांना मशरूम, आंबा संकलित करून ठेवण्यासाठी सोलर ड्राय मशीनचा पुरवठा करण्याकरीता 85 टक्के अनुदानावर आर्थिक सहाय्य देणे, अनुसूचित जमातीच्या बचत गटांना टोळी पासून तेल काढण्याकरीता मशीन खरेदी करण्याकरीता 85 टक्के अनुदानावर आर्थिक सहाय्य देणे आदी योजनांचा समावेश आहे. योजनानिहाय पात्र बचत गटांकडून 27 जुलै ते 10 ऑगस्ट  2022 पर्यंत सुट्टीचे दिवस सोडून अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा.

आदिवासी नृत्य स्पर्धेकरीता अर्ज : प्रकल्प स्तरावर आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा 4 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करावयाची असून त्याकरीता आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा मंडळाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील मंडळांनी संपूर्ण माहितीसह असलेले प्रस्ताव 27 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत सुट्टीचे दिवस सोडून कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.

००००००००

No comments:

Post a Comment