29 जुलै रोजी वन प्रबोधिनी येथे जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन
Ø केंद्रीय मंत्र्यांची राहणार उपस्थिती
चंद्रपूर,दि. 28 जुलै : राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण तसेच पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने दि. 29 जुलै रोजी वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंदर यादव व केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे तसेच इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेले विशेष व्याघ्र संरक्षण दलाची परेड व सलामी होणार असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. 29 जुलै रोजी वन प्रबोधिनी, चंद्रपूर येथे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची 21 वी बैठक, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची 69 वी सभा तसेच मंत्री महोदयांसोबत देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक यांच्यासोबत खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
०००००
No comments:
Post a Comment