Search This Blog

Friday, 8 July 2022

चंद्रपूर येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय सुरु

 

चंद्रपूर येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय सुरु

चंद्रपूर, दि. 8 जुलै : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय, प्रशासकीय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा माळा, चंद्रपूर येथे 7 जुलै पासून सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, चंद्रपूरचे सहाय्यक आयुक्त तथा उपाध्यक्ष जितेंद्र चौधरी, उपसंचालक दिगांबर चव्हाण, पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील, रवींद्र येरचे तसेच कार्यालयीन कर्मचारी  प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment