स्पर्धा परीक्षा व मुलाखतीचे तंत्र या विषयावर मार्गदर्शन
Ø 70 विद्यार्थ्यांनी घेतला मार्गदर्शन सत्राचा लाभ
चंद्रपूर, दि. 5 जुलै: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षा व मुलाखतीचे तंत्र या विषयावर मार्गदर्शन सत्र नुकतेच पार पडले.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत, भाग्यश्री वाघमारे, नंदकिशोर दासरवार तसेच राणाज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक इर्शाद शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी, राणाज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक इर्शाद शेख यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतांना कोणकोणत्या पुस्तकांचा वापर करावा याची माहिती दिली व अभ्यासक्रमाबाबत तंत्रशुद्ध माहिती देत मार्गदर्शन केले. तसेच मुलाखतीकरिता आवश्यक असणारे घटक, मुलाखतीची पूर्वतयारी, मुलाखती दरम्यानचे वक्तृत्व, देहबोली आदीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील उमेदवार तसेच इतर संस्थेतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे एकूण 70 उमेदवारांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा थेरे, संचालन महात्मा गांधी नॅशनल फेलो अजय चंद्रपट्टण यांनी तर आभार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अमरीन पठाण यांनी मानले.
०००००००
No comments:
Post a Comment