Search This Blog

Tuesday, 19 July 2022

मतदार ओळखपत्र होणार आधार कार्डशी लिंक

 

मतदार ओळखपत्र होणार आधार कार्डशी लिंक

Ø 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम

चंद्रपूर, दि. 19 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. सदर सुधारणांची अंमलबजावणी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे.

उपरोक्त कायदा आणि नियमांमध्ये केलेल्या सुधारणानंतर, मतदार नोंदणी अधिकारी हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आणि रीतीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरीत्या प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच अधिसूचना दि. 17 जून 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि. 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती याचा आधार क्रमांक उपलब्ध करून देऊ शकतो. त्यास अनुलक्षूण भारत निवडणूक आयोगाद्वारा कालबद्ध पद्धतीने मतदारांकडून आधार क्रमांक प्राप्त करून घेण्यासाठीचा कार्यक्रम सुरू करण्याचे निश्चित केले आहे.

अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या eco.gov.in आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच मतदारांना ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक 6 ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच अर्ज क्रमांक 6 ब च्या छापील प्रती देखील उपलब्ध करून देण्यात येईल. ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल, ॲपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्यावतीने ऐच्छिक आहे. अर्ज क्रमांक 6 ब बीएलओ यांच्या मार्फतही घरोघरी भेटी देऊन गोळा करण्यात येईल. विशेष शिबिराच्या आयोजनांमधूनही अर्ज क्रमांक 6 ब गोळा करण्यात येईल. मतदारांकडे आधार क्रमांक नसल्यास अर्ज क्रमांक 6 ब मध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रांपैकी एक कागदपत्र सादर करता येईल. त्यामध्ये पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, इपिक कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्यशासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र, मतदार यादीशी आधार क्रमांकांची जोडणी ऐच्छिक आहे. केवळ आधार सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून नाव काढून टाकले जाऊ शकत नाही.

तरी, मतदार यादीतील नावाशी 1 ऑगस्ट 2022 पासून मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी मांजे यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment