Search This Blog

Wednesday 20 July 2022

इन्स्पायर अवार्ड मानक योजना 2022-23

 

इन्स्पायर अवार्ड मानक योजना 2022-23

Ø 30 सप्टेंबरपर्यंत नामांकने सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 20 जुलै : इन्स्पायर अवार्ड मानक योजनेअंतर्गत सन 2022-23 मध्ये इयत्ता 6वी ते 10वी या वर्गात शिकणाऱ्या सर्व शासनमान्य (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे 5 उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर नामांकने सादर करावयाची आहे. याकरिता नामांकने सादर करण्याचा कालावधी  दि. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप E-MIAS पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यातील नामांकन वाढविण्याच्या दृष्टीने नामांकनाबाबतची स्थिती वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर द्वारा कळविण्यात येणार आहे.

तरी, दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नामांकने www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर सादर करुन शाळेतील कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण यांनी कळविले आहे.

००००

No comments:

Post a Comment