Search This Blog

Thursday, 21 July 2022

मशरूम उत्पादन व उत्पादने प्रशिक्षण कार्यक्रम

 

मशरूम उत्पादन व उत्पादने प्रशिक्षण कार्यक्रम

Ø इच्छुक युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 21 जुलै :  महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे  7 वी  पास  व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 27 ते 29 जुलै 2022 या 3 दिवस कालावधीमध्ये दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मशरुम उत्पादन व उत्पादने प्रशिक्षण  कार्यक्रम आयोजित  करण्यात येत आहे.   

सदर प्रशिक्षणामध्ये मशरुम उत्पादन उद्योगास असलेला वाव, मशरुम उत्पादन प्रक्रिया, मशरुमपासून विविध उत्पादने तयार करणे, पॅकेजींग, लेबलींग तसेच मशरुम उत्पादनाचे ब्रँडिग, अन्न व सुरक्षा आणि मानके, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणीतील विविध टप्पे, बाजारपेठ पाहणी, विक्रीकला व उद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्जविषयक योजनांची माहिती, कर्जप्रकरण इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या वेबसाईटवर 26 जुलै 2022  पर्यंत ऑनलाईन  अर्ज करावा अथवा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, दुसरा माळा, बस स्टॉप समोर, चंद्रपूर येथे शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416,  कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे,मो.9011667717 व अभिषेक सुरदुसे मो. 8554999768 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्राचे  प्रकल्प अधिकारी  के.व्ही.राठोड यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment