Search This Blog

Thursday, 7 July 2022

शेतकरी उत्पादक गटांना गोदाम बांधकाम करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


शेतकरी उत्पादक गटांना गोदाम बांधकाम करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 7 जुलै : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2022-23 अंतर्गत गळीत धान्य उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी व मूल्य वृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके व कडधान्य पिके घेतली जातात तथापि गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदामाचे बांधकाम करावे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य कार्यक्रमानुसार जिल्ह्यास दोन्ही योजनेंतर्गत प्रत्येकी 1 गोदाम बांधकाम घटकाचे लक्षांक प्राप्त आहे.

250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 12.50 लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. वरीलप्रमाणे दोन्ही योजनेकरिता सदर बाब बँक कर्जाशी निगडित असून केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी एफपीओ/एफपीसी अर्ज करू शकतील.

तरी, इच्छुक शेतकरी उत्पादक संघ, एफपीओ/एफपीसी यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 20 जुलै 2022 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment