लोकशाही दिनामुळे सर्वच स्तरातील महिलांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली निघण्यास मदत -रुपाली चाकणकर
चंद्रपूर, दि. 25 जुलै: महाराष्ट्र राज्य महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. समाजातील स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे परिणामकारकरीत्या सनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारणे, उंचावणे या गोष्टीशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर शासनाला सल्ला देण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांच्या दैनंदिन समस्या, महिलांची सुरक्षितता व आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर देखील आयोगाने वेळोवेळी शासनास शिफारशी सुचविल्या आहेत.
राज्य शासनाने लोकशाही दिनाची अंमलबजावणी तालुकास्तर, जिल्हास्तर व विभागीय आयुक्त स्तरापासून ते मंत्रालयीन स्तरापर्यंत होण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रकानुसार विविध सूचना दिल्या आहेत. महिलांच्या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवरच झाल्यास त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी इतरत्र कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या लोकशाही दिनामुळे सर्वच स्तरातील महिलांचे प्रश्न लवकरात लवकर निघण्यास मदत होईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment