Search This Blog

Thursday, 14 July 2022

18 जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 


18 जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर,दि. 14 जुलै : जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 18 जुलै 2022 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी  यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात येत आहे.

या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी, अशी प्रकरणे आणि विहीत अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी, ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन  वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा  महिला  व बालविकास अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येईल. तसेच या महिला लोकशाही दिनामध्ये जिल्हास्तरीय तक्रार अर्ज व तालुकास्तरावरील अपीलीय अर्ज  स्वीकारण्यात येतील. अर्जाचा नमूना या कार्यालयामार्फत महिला लोकशाही दिनी पुरविण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

०००००००००

No comments:

Post a Comment