उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2022
Ø फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश निर्गमित
चंद्रपूर, दि. 28 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली असल्याचे विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, विभागीय मंडळ, नागपूर यांनी कळविले आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2022 मधील परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 100 मीटर परिसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 100 मीटर परिसरातंर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही.
सदर परीक्षेमधील परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातंर्गत, क्षेत्रांतर्गत सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नियमित व रोजच्या वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा-2022 मधील परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी. बूथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतेही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील. सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील उपरोक्त परीक्षेच्या सर्व परीक्षा केंद्रांना लागू राहील.
हा आदेश 21 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अमलांत राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षक पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.
००००००
No comments:
Post a Comment