Search This Blog

Saturday, 16 July 2022

शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर आता प्रतिबंधात्मक डोज मोफत

 शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर आता प्रतिबंधात्मक डोज मोफत

Ø  दहा लाख 43 हजार 853 नागरिकांसाठी डोजचे नियोजन

Ø  15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव

चंद्रपूर, दि. 16 जुलै : केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 (75 दिवस) या कालावधीमध्ये ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर प्रतिबंधात्मक (बुस्टर) डोज आता मोफत मिळणार आहे. 18 वर्षावरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुस-या डोजनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा.

सध्या स्थितीत जिल्ह्यातील 18 वर्षांमधील लसीकरणाकरिता पात्र लाभार्थ्यांची संख्या 16 लक्ष 41 हजार 830 असून पहिला डोज 15 लक्ष 83 हजार 281 (96.43 टक्के) नागरिकांना दिला आहे.  दुसरा डोस 13 लक्ष 54 हजार 425 ( 82.93 टक्के) नागरिकांनी घेतला आहे तर 35097 नागरिकांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे. जिल्ह्यातील आणखी 10 लक्ष 43 हजार 853 लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक डोज देण्यात येणार आहे.

कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, आठवडी बाजार आदी ठिकाणी विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.  गणेशोत्सवादरम्यान सर्व गावांमध्ये गणेश मंडळांच्या सहाय्याने लसीकरण शिबिर घेण्यात येतील.

सदर मोहिमेचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी आपला प्रतिबंधात्मक डोस जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन मोफत घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  मिताली सेठी, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment