Search This Blog

Tuesday 12 July 2022

15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


 

15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 12 जुलै जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून 15 जुलै 2022 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत शारीरिक क्षमता चाचणी या विषयावर फिजीकल करीअर अकादमीचे संचालक रोशन भुजाडे यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्रमांक 5 व 6 येथे आयोजित या सत्रात पोलिस उपनिरीक्षक, सैन्यभरती, पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी उमेदवारांनी या सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता 07172- 252295 या क्रमांकावर संपर्क साधावा.

००००००

No comments:

Post a Comment