समाजकल्याण कार्यालयातर्फे सामाजिक न्याय दिन कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 5 जुलै : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, चंद्रपूर येथे सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. टिकले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्ही. डी. मेश्राम व डी. के. आरीकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यालयातील अधिनस्त शासकीय निवासी शाळा, शासकीय वस्तीगृह व विजाभज आश्रमशाळा येथील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ प्राप्त विद्यार्थ्यांचा तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने समाज कल्याण कार्यालय परिसरातून समता दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे आभार मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या गृहपाल एस. पी. खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
००००००
No comments:
Post a Comment