Search This Blog

Friday, 15 July 2022

सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणा-या संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणा-या संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 14 जुलै जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाद्वारे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर, निराधार, परितक्त्या, विधवांच्या मुलींच्या विवाहकरीता शुभमंगल नोंदणीकृत / सामुहिक विवाह योजना राबविण्यात येते. सदर योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी लाभार्थ्यांच्या वडीलांचे वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये इतकी आहे. अशा कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रति जोडपे 10 हजार रुपये, शासन निर्णयातील विहित अटी व शर्तीच्या अधिन राहून लाभार्थ्यांना देण्यात येतात.

सदर योजना ही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून संस्थांना 5 ते 100 जोडप्यांचा समावेश करता येतो. तसेच सर्व कागदपत्रे विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर अटी व शर्तीच्या अधिन राहून महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास अर्जासह सादर करणे आवश्यक आहे. तसेच वैयक्तिक लाभार्थी विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत विवाह करून अटी व शर्तीच्या अधिन राहून कार्यालयात प्रस्ताव सादर करू शकतात.

सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे प्रोत्साहनपर दोन हजार रुपयांचे अनुदान, विवाहाचे आयोजन व विवाह समारंभाचा अनुषंगिक खर्च तसेच विवाह नोंदणी खर्च भागविण्यासाठी देण्यात येतो. तरी जिल्ह्यातील सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणा-या स्वयंसेवी संस्थांनी विहित नियमान्वये लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव किमान एक महिन्यापूर्वी कार्यायालत सादर करावे व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा. अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.

०००००००००

No comments:

Post a Comment