Search This Blog

Monday, 25 July 2022

जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम

 जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 25 जुलै : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सर्व न्यायाधीश व वकील तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी देखील वृक्षारोपण केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, न्यायालय व्यवस्थापक सुशील भाले यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी तसेच जिल्हा न्यायालय कर्मचारी उपस्थित होते.

०००००

No comments:

Post a Comment