Search This Blog

Tuesday, 5 July 2022

सन 2022-23 करीता मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशाबाबत अर्ज आमंत्रित

सन 2022-23 करीता मुला-मुलींच्या शासकीय

सतीगृहाच्या प्रवेशाबाबत अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 5 जुलै : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयाअंतर्गत शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने (मॅन्युअली) करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी येथील मुलांचे वस्तीगृह तर चंद्रपूर, मुल, बल्लारपूर, चिमूर व  ब्रह्मपुरी येथील मुलींच्या वस्तीगृह प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांनी संबंधित गृहपाल यांच्याशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून घ्यावे व सदर अर्ज विहित नमुन्यात भरून संबंधित गृहपाल यांच्याकडे सादर करावेत.

ऑफलाइन (मॅन्युअली) प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. 15 जुलै 2022 पर्यंत, इयत्ता 10 वी व 11वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि. 30 जुलै 2022 पर्यंत, बी.ए./बी.कॉम./बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम.ए./एम.कॉम./एम.एस.सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि. 24 ऑगस्ट 2022 पर्यंत तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.

००००० 

No comments:

Post a Comment