Search This Blog

Tuesday 10 January 2023

1 फेब्रुवारी ते 31 मे या कालावधीत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

 1 फेब्रुवारी ते 31 मे या कालावधीत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

चंद्रपूर, दि. 10 : धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईच्या वतीने यावर्षी सर्वधर्मिय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, शहीद जवान कुटुंब, कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांची मुले, भटक्या जाती, विमुक्त जाती, अनुसुचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांची तसेच अनाथ मुले-मुली आदी घटकांना या सामुदायिक विवाह सोहळयाच्या आयोजनात प्राथमिकता दिली जाणार आहे. सदर सामुदायिक विवाह सोहळा 1 फेब्रुवारी ते 31 मे 2023 या कालावधीत आयोजित केला जाणार आहे.

हा सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडावा यासाठी चंद्रपूरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त पी.के. करवंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्हयातील धर्मादाय विश्वस्तांची सामुदायिक विवाह सोहळा आयोजन समिती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

आयोजन समितीच्या अध्यक्षपदी शोभा पोटदुखे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी  कैलाश खंडेलवाल, सचिव निलम राचलवार, कोषाध्यक्ष रामदास वाघदरकर, सदस्यपदी अॅड. राजेश्वर ढोक, अॅड. मनोज काकडे, ॲड. रितेश संघवी, ॲड. आशिष गुप्ता, उत्तमराव मोहितकर, धुन्नाजी, योगेश पांडे, हर्षवर्धन सिंघवी, सुरेशजी लोहे, मसुद अहमद, सुधाकरराव कडू यांची निवड करण्यात आली. हा उपक्रम समाजातील सेवाभावी संस्था व इतर घटकांच्या सहकार्याने पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यालयाचे अधिक्षक आर. आर. ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००

No comments:

Post a Comment