पोस्ट विभागाच्या अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ
चंद्रपूर, दि. 16 : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. सरकारने राष्ट्रीय बचत पत्र, पोस्ट ऑफिस मुदत ठेव, किसान विकास पत्र, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. अर्थखात्याने काढलेल्या परीपत्रकानुसार जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी काही बचत (सेव्हिंग) स्कीमवरील व्याजदर 0.20 टक्के ते 1.10 टक्के वाढवण्यात आले आहेत. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचे व्याजदर 7.1 टक्क्यांवर कायम असून किसान विकास पत्राच्या व्याजदरात 7 टक्क्यावरून 7.2 टक्के वाढ करण्यात आली आहे.
या नव्या निर्णयानुसार, राष्ट्रीय बचत पत्रावर 1 जानेवारीपासून 7 टक्के दराने व्याज मिळणार आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 7.6 टक्क्यांऐवजी 8 टक्के व्याज मिळेल. 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठीच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेवरील व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढला आहे. अल्पबचत योजनांचे जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठीचे व्याजदर जाहीर करण्यात आले असून या नव्या निर्णयाचा अनेक गुंतवणूकदारांना फायदा व गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे, असे पोस्ट विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.
०००००
No comments:
Post a Comment