Search This Blog

Friday, 20 January 2023

स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपनीचा बँकेसोबत अनुदान करार

 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपनीचा बँकेसोबत अनुदान करार

चंद्रपूर, दि. 20 : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत नंदोरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रकल्प आराखड्यास अंतिम मंजुरी 5 जानेवारी 2023 रोजी प्राप्त झाली. सदर शेतकरी कंपनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सोयाबीनतूरहरभरा या पिकाचे स्वच्छता व प्रतवारी करणार आहेत. कंपनीचे एकूण प्रकल्प मूल्य 216.40 लाख असून स्मार्ट योजनेअंतर्गत कंपनीस 60 टक्के म्हणजे 129.89 लाख अनुदान मिळणार आहे. सदर कंपनीचा बँक ऑफ महाराष्ट्र सोबत अनुदान करार जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत 20 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा स्मार्ट प्रकल्पाचे प्रमुख जिल्हा अंमलबजावणी अधिकारी भाऊसाहेब बरहाटेस्मार्टचे पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ गणेश मादेवारबँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी पंकज भैसारेनंदोरी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडेवित्तीय सल्लागार मधूसुधन टिपलेकंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिका-यांनी कंपनीस प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा देऊन जिल्ह्यात इतर मंजूर कंपनीचीसुद्धा आवश्यक प्रक्रिया लवकर करून घेण्याचे सूचना दिल्या.


००००००

No comments:

Post a Comment