Search This Blog

Thursday 5 January 2023

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी सर्व संबंधित मतदान केंद्रावर प्रसिद्ध

 

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी सर्व संबंधित मतदान केंद्रावर प्रसिद्ध

चंद्रपूर, दि. 05: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी, 2023 या अहर्ता दिनांकावर आधारित विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार तयार करण्यात आलेली 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी दि. 5 जानेवारी, 2023 रोजी विधानसभा मतदारसंघातील सर्व संबंधित मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर मतदार यादी मतदारांना पाहण्यासाठी संबंधित मतदान केंद्रावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तरी, मतदारांनी मतदार यादीचे अवलोकन करून मतदार यादीत नाव समाविष्ट असल्याबाबतची खात्री करून घ्यावी, असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment