16 जानेवारी रोजीचा महिला लोकशाही दिन रद्द
चंद्रपूर, दि. 13: नागपूर विभागात विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक-2022 साठीची आदर्श आचारसंहिता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात 29 डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. तरी, माहे जानेवारी 2023 महिन्यांमधील सोमवार, दि. 16 जानेवारी 2023 रोजीचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन रद्द करण्यात येत आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
000000

No comments:
Post a Comment