Search This Blog

Thursday, 12 January 2023

चला जाणूया उमा नदीला उपक्रमांतर्गत मुरपार (तु.) येथे जल दिंडीचे आयोजन




चला जाणूया उमा नदीला उपक्रमांतर्गत मुरपार (तु.) येथे जल दिंडीचे आयोजन

चंद्रपूर, दि. 12 ‘चला जाणूया नदीला’ अभियान गावागावात पोहचविण्यासाठी तसेच श्रमदान आणि लोकसहभाग मिळविण्याच्या उद्देशाने चिमूर तालुक्यातील मुरपार तुकुम येथे उमा नदी संवाद यात्रेअंतर्गत जल दिंडीचे आयोजन करण्यात आले. प्रभु फाऊंडेशन चंद्रपूर व ग्रामपंचायत मुरपार तूकुम यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित जल दिंडी कार्यक्रमात मुरपार तुकुम येथील जिल्हा परिषद तसेच उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थीमहिला बचत गट, गुरुदेव मंडळ, भजन मंडळ, युवक मंडळ तसेच गावातील लोकांनी मोठ्या संखेने सहभाग घेतला.

सर्वप्रथम  गुरुदेव सेवा मंडळाच्या मंदिरात जल दिंडीची विधिवत पुजा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच मुरपार तुकुम येथे उमा नदीच्या तिरावर नदीमधील जल घेऊन लहान  नऊ कन्येचे पूजन करण्यात आले. सरतेशेवटी गुरुदेव सेवा मंडळाच्या ठिकाणी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच जगदीश नन्नावरे यांच्यासह उपसरपंच भरत अथरगड़े, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दडमल, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमा नदी प्रहरी सदस्य अजय काकडे उपस्थित होते.

श्री. काकडे यांनी चला जाणूया नदिला अभियान बाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर शासनाचे अभियान यशस्वी करण्यासाठी श्रमदान आणि लोकसहभागाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण वाघाडे यांनी तर आभार किशोर बुरले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदेव मंडळाचे सदस्यग्रामरोजगार सेवक महादेव नन्नावरे, ममता सरपाते तसेच महिला बचत गट सदस्य यामिना अथरगड़े आणि गावक-यांनी सहकार्य केले.

००००००००

1 comment:

  1. उमा नदी बद्दल जानुया सदर कार्यक्रम खरच चांगला आहे. नदी बद्दल जाणून घेतांना एप्रिल मे महिन्यात नदी मध्ये थेंब भर पाणी राहू शकत नाही, जे की पावसाळ्यात नदी दुथडी वाहून पाणी घेउन जाते, त्यासाठी वाहून जाणाऱ्या पाण्याला थांबवा, बंधारे छोटे छोटे बांधा, गोसिखुर्द नहरातून दर पंधरा दिवसातून पाणी सोडल्यास नदी बारमाही वाहू शकते, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, वन्य प्राणी मानव संघर्ष होणार नाही, दुबार पीक घेता येईल, चारा उपलब्ध होईल.

    ReplyDelete