वित्त विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा
Ø 6 ते 8 जानेवारी रोजी सैनिकी शाळा विसापूर येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन
चंद्रपूर, दि. 05: संचालनालय, लेखा व कोषागारे कल्याण समिती, मुंबई अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा 6 जानेवारीपासून सैनिक शाळा, चंद्रपूर येथे सुरु होत असून या क्रीडा स्पर्धेमध्ये नागपुर विभागातंर्गत 6 जिल्हयातील एकुण 500 खेळाडु सहभागी होणार आहे. 7 जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन सैनिकी शाळेचे प्राचार्य लेफ्टनंट कर्नल पी. डेविडसन यांच्या हस्ते पार पडणार आहे.
याप्रसंगी नागपुरच्या लेखा व कोषागारे सहसंचालक सुवर्णा पांडे, स्थानिक निधी लेखा सहसंचालक मोना ठाकुर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांची उपस्थिती असणार आहे.
8 जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धेचा समारोप कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कबड्डी खेडाळु अनिल माळवे यांचे हस्ते होईल. विभागीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, मनपाचे मुख्य लेखापरीक्षक मनोहर बागडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम, स्थानिक निधी लेखा सहा. संचालक अमित मेश्राम, कोषागार अधिकारी प्रफुल वडेट्टीवार यांनी अथक परिश्रम घेतले.
त्यासोबतच दिपक जेऊरकर, संदीप जेऊरकर, राजरत्न बेले, संजय पडीशाला, राजश्री सेलुकर, अजयसिंह राठोड, जयदिप साधनकर, पंकज खनके, निलेश बोनगीरवार, संदिप ठाकरे, संजय श्रीपाद, एम.बी. सय्यद, स्वाती दारुणकर व लेखा व कोषागारातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर स्पर्धा यशस्वी होण्याच्या दुष्टीने सहकार्य केले.
000000
No comments:
Post a Comment