Search This Blog

Monday 9 January 2023

शहीद बाबुराव शेडमाके ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेसंदर्भात हरकती व आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन

 शहीद बाबुराव शेडमाके ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेसंदर्भात

हरकती व आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 09 : मुल तालुक्यातील नियोजित शहीद बाबुराव शेडमाके ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मारोडा या संस्थेची नोंदणी होण्याकरीता नोंदणी प्रस्ताव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, मूल कार्यालयात सादर करण्यात आला आहे. मुल तालुका कार्यक्षेत्रातील नागरी, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांना सदर नियोजित संस्था नोंदणी संबधाने हरकती व आक्षेप असल्यास दि. 10 जानेवारी 2023 रोजी दुपारी  3 वाजता कार्यालयास उपस्थित राहावे. तसेच तोंडी व लेखी म्हणने सादर करावे. विहित वेळेत हरकती व आक्षेप सादर न केल्यास संबधितांचे काहीही हरकत व आक्षेप नाही, असे गृहित धरून संस्था नोंदणीची पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment