Search This Blog

Tuesday, 10 January 2023

शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक

 

शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक

Ø शेतकरी नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 10 : खरीप पणन हंगाम 2022-23 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2022-23 पासून ज्या शेतकऱ्याचा सातबारा आहे, त्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचा सुचना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहे.

धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत 7 जानेवारीपर्यंत आहे असे कळविण्यात आले होते. परंतु, महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा ऑनलाईन सातबारा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी भात कापणी चालू असल्याने मागील हंगामाच्या तुलनेत अद्यापही पुरेशी शेतकरी नोंदणी झाली नसल्यामुळे तसेच शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाली असल्याने शासनाने धान व भरडधान्य खरेदीकरीता एन.ई.एम.एल पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी, दिलेल्या मुदतीत शेतकरी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment