Search This Blog

Tuesday 10 January 2023

वित्त विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूरला विजेतेपद

 वित्त विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूरला विजेतेपद

चंद्रपूर, दि. 10 : संचालनालय, लेखा व कोषागारे कार्यकारी कल्याण समितीद्वारे वित्त विभागाच्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे 7 व 8 जानेवारी रोजी सैनिकी शाळा, विसापूर येथे आयोजन करण्यात आले होते. यात सहा जिल्ह्यातील एकूण 500 खेळाडू विविध स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

या क्रीडा स्पर्धेत प्रथमच विभागीय विजेतेपदाची घोषणा करण्यात आली. यात चंद्रपूर जिल्ह्याने 111 गुण प्राप्त करत विभागीय विजेतेपद पटकावले तर नागपूर जिल्ह्याने 76 गुणांसह द्वितीय क्रमांक, वर्धा जिल्ह्याने 67 गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या खेळाडूंना पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

8 जानेवारी रोजी क्रीडा स्पर्धेची सांगता झाली. स्पर्धेचा समारोप कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू अनिल माळवे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुवर्णा पांडे, डॉ. सोनी, गीता नगर, गजानन बोकडे, गजानन हिरुडकर, चंद्रशेखर आंबोडे, प्रवीण पत्की, विजय अंड्रस्कर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, मुख्य लेखा परीक्षक (मनपा) मनोहर बागडे, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम, सहाय्यक संचालक अमित मेश्राम, कोषागार अधिकारी प्रफुल्ल  वडेट्टीवार तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

००००००

No comments:

Post a Comment