अवैध रेती उत्खनन प्रकरणी वाहने व साहित्य जप्त
चंद्रपूर, दि. 31 : घुग्गुस शहरालगतच्या वर्धानदी पात्रामध्ये अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नकोडा घाट या ठिकाणी धाड टाकली असता त्याठिकाणी एका मोटर बोटद्वारे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळले. तसेच डब्ल्यू.सी.एल.च्या जागेवरून सदर रेती घाटावर जाण्याकरीता रॅम्प तयार करून नदीतून अवैध रेती उत्खनन सुरू होते जवळच लागून असलेल्या डब्लू.सी.एल.च्या मालकीच्या सर्व्हे नंबर 56 मध्ये एक जेसीबी, एक पोकलेन मशीन व अंदाजे 40 ब्रास रेती साठा आढळून आला.
या अवैध उत्खननामध्ये गुंतलेली सर्व वाहने व साहित्य जप्त करण्यात आले असून सदर वाहनांच्या मालकावर व अवैध रेतीसाठा केलेल्या संबंधितावर प्रशासनाद्वारे नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.
००००००००
No comments:
Post a Comment