महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयास विजेतेपद
Ø वरोरा उपविभाग उपविजेता
चंद्रपूर, दि. 23 : महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे 20 ते 22 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने 336 गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकाविला तर वरोरा उपविभागाने 150 गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत सहभागी तसेच विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र, पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी, उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम., निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्याचे तहसीलदार तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना मुरुगानंथम एम. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पदक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर विजेता तर वरोरा उपविभाग उपविजेता ठरला. तर सांस्कृतीक स्पर्धेत जिल्हाधिकारी कार्यालय प्रथम आणि चंद्रपूर-बल्लारपूर उपविभागाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत महसूल विभागातील 400 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. या स्पर्धेत 14 क्रीडा प्रकाराच्या सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 100 मी.,200 मी. व 400 मी. धावणे स्पर्धा, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, लांबऊडी, जलतरण, खो-खो, थ्रो-बॉल, बुद्धीबळ, बॅडमिंटन, फुटबॉल तसेच कबड्डी आदी खेळ प्रकराचा समावेश होता. सहभागी खेळाडुंनी आपापले मनोगत व्यक्त केले. 22 जानेवारी रोजी महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेची सांगता झाली.
००००००
No comments:
Post a Comment