21 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 20 : मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, मुंबई आणि डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दीक्षाभूमि येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर उपस्थित राहतील. तर प्रमुख वक्ते म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड हे ‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मराठी भाषेवर प्रेम करणा-या सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर, भाषा संचालक विजया डोनीकर आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजया गेडाम यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment