Search This Blog

Thursday, 5 January 2023

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ईआर-1 मध्ये सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत

 मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती आर-1 मध्ये सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत

           चंद्रपूर, दि. 05: चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस भरणे आवश्यक आहे. विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahawayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सदर माहिती सादर करणे बंधनकारक असून अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत आहे.

           डिसेंबर 2022 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र. 5/6, चंद्रपूर या कार्यालयाद्वारे ऑनलॉइन पध्दतीने दि.1 जानेवारी 2023 पासून सुरु झाले आहे. याकरीता सर्व आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. तरी, चंद्रपूर जिल्हयातील सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेतच. त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या  www.rojgar.mahawayam.gov.in  या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपली अचूक  माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

            सदरील डिसेंबर 2022 अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 आहे, याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. हे तिमाही‍ विवरण विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. तद्वतच प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील Employer Profile  देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ  अद्यावत करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

           यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा  माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com अथवा asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in यावर तसेच दुरध्वनी क्र.07172-252295 वर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधावा, असेही कौशल्य विभागाने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment