‘चला जाणूया नदीला’ अभियानाचा आढावा
चंद्रपूर, दि. 16 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ अभियानअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समितीची मुख्य वनसंरक्षक, कार्यालय चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी मध्य चांदा विभागाच्या उपवनसंरक्षक तथा अभियानच्या सदस्य सचिव श्वेता बोड्डू, जलसंधारण तथा अभियानचे नोडल अधिकारी पवन देशेट्टीवार, कृषि उपसंचालक रविंद्र मनोहरे तसेच वन, पाटबंधारे, शिक्षण, आरोग्य, खनिकर्म, भूजल सर्वेक्षण, जिल्हा परिषद इ. विभागाचे अधिकारी आणि शासनामार्फत नियुक्त नदी प्रहरी सदस्य राहुल गुळघाणे, सुरेश चोपणे, अजय काकडे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील उमा नदी (150 किमी लांबी) अंतर्गत चिमूर, सिंदेवाही, मुल तालुक्यातील एकूण 98 गावे आणि इरई नदी (78किमी) अंतर्गत चिमूर, चंद्रपूर आणि बल्लारपूर तालुक्यातील एकूण 83 गावांमध्ये हे अभियान 2 ऑक्टोबर 2022 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यात पाणलोट क्षेत्रातील मृद व जल संधारणाचे उपचार, जमिनीचे आरोग्य, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन अशा विविध विषयावर गाव भेटी व शिवार फेरी, संवाद यात्रा इ. द्वारे प्रचार व प्रसार आणि या गावामध्ये जलयुक्त शिवार कार्यक्रमअंतर्गत झालेल्या कामाची माहिती देणे आणि नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
०००००००
No comments:
Post a Comment