राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनो जात वैधता प्रमाणपत्र सादर करा अन्यथा होणार अपात्रतेची कारवाई
Ø संबधित तहसील कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 13 : चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यातील 629 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान दि. 15 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आले असून मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी करण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी पडताळणी समितीकडून प्राप्त झालेले जातीचे वैधता प्रमाणपत्र महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, यांचे परिपत्रक दि. 10 मे 2022 अन्वये, 17 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच व सदस्य यांच्यावर अपात्रतेची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी पल्लवी घाटगे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment