Search This Blog

Wednesday 25 January 2023

खेलो इंडिया फुटबॉल मिशन अतंर्गत खेळाडूंची निवड चाचणी


खेलो इंडिया फुटबॉल मिशन अतंर्गत खेळाडूंची निवड चाचणी

चंद्रपूर, दि.25: खेलो इंडिया फुटबॉल मिशन अतंर्गत जिल्ह्यातील 15 व 17 वर्ष वयोगटातील फुटबॉल खेळाडूंची निवड करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याकरीता जिल्ह्यातील प्रतिभावंत फुटबॉल खेळाडूंची निवड चाचणी दि. 28 व 29 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

यामध्ये 15 वर्षाआतील वयोगटातील मुलांची निवड चाचणी 28 जानेवारी रोजी तर 17 वर्षाआतील वयोगटातील मुलांची 29 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे.  तरी, या निवड चाचणी कार्यक्रमानुसार  जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment