Search This Blog

Sunday, 29 June 2025

दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी अर्ज आमंत्रित

 दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि. 29 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय पुरस्कार सन 2025 साठी अर्ज व नामांकन ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. हे अर्ज www.awards.gov.in या केंद्रीकृत पोर्टलवर 15 मे पासून 15 जुलै 2025 पर्यंत सादर करता येणार आहेत.

राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज सादर करताना फक्त ऑनलाइन प्रणालीच स्वीकारण्यात येणार असूनप्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज हे पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यात सविस्तर व प्रेरणादायी कार्याची माहिती देऊन भरायचे आहेत.

या पुरस्कारांसाठी पात्रता निकषअर्जाची माहिती व मार्गदर्शक सूचनांचे सविस्तर विवरण दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.depwd.gov.in वर उपलब्ध आहे.

याबाबत अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सदर प्रक्रियेत सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

००००००

Friday, 27 June 2025

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड



 

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड

Ø रोजगार मेळाव्यात 20 जणांना नियुक्तीपत्र प्रदान

चंद्रपूरदि. 27 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचंद्रपूर येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवारी रोजगार भरती मेळाव्यात 70 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 20 जणांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच प्राचार्य वैभव बोंगीरवार यांच्या मार्गदर्शनात मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्रचंद्रपूर द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकावू उमेदवारी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होतेया भरती मेळाव्याकरिता व्हेरॉक इंजिनिअरिंगधूत ट्रान्समिशनपटले प्लेसमेंट सर्विसेसस्पीक अँड स्पेन एज्युकेशन सोल्युशन्स लिमिटेडब्रह्मा इंजीनियरिंग अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडवैभव एंटरप्राइजेस अँड प्लेसमेंट सर्विसेस इत्यादी आस्थापनांनी सहभाग नोंदविलाया रोजगार भरती मेळाव्यात एकूण 260 विद्यर्थ्यांनी सहभाग नोंदविला

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य अधिकारी तथा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करण्याचे महत्त्व पटवून दिलेतसेच मेळाव्याद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचे आवाहन केलेनिवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याशिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याकरिता अप्रेंटिसशिप सेल तथा राईट वॉक फाउंडेशन चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे समन्वयक कपिल बांबोडे यांनी अप्रेंटिसशिपत्याचे फायदेनिवड प्रक्रिया आणि सॉफ्ट स्किल याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन योगेश धवणे यांनी केलेयावेळी कंपनी कोऑर्डीनेटर म्हणून विजय तांदळेमनोज पाटीलश्रीखोब्रागडे तसेच इतर समन्वयकबीटीआरआयच्या श्रीमती लोखंडेश्रीमहातो तसेच  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनदेशक श्रीनंदेश्वरनिमसरकारचांदेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

००००००

तृतीयपंथीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास शासन कटिबद्ध : अतिरिक्त जिल्हाधिकारी व्यवहारे




 

तृतीयपंथीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास शासन कटिबद्ध : अतिरिक्त जिल्हाधिकारी  व्यवहारे

Ø सामाजिक न्याय दिन व तृतीयपंथीय कार्यशाळा

चंद्रपूरदि. 27 : तृतीयपंथीय हे समाजाचा अविभाज्य घटक असून काही गैरसमजुती पोटी आपण त्यांना आपल्यापासून दूर केले आहे. याचा परिणाम म्हणून त्यांना संघर्षांला सामोरे जावे लागत आहे. मात्र यापूढे ते आपला समाज घटक आहेतआपले बांधव आहेतअसे समजुन आपण सर्वांनी त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करावा व शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावेअसे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी नितिन व्यवहारे यांनी केले.

   सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणजिल्हा जात पडताळणी समितीडॉ. बाबासाहेव आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीसमतादुत प्रकल्प व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित सामाजिक न्याय व तृतीयपंथीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडेजिल्हा क्रीडा अधिकारी नंदु आवारेजिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर,  प्रकल्प अधिकारी विकास राचेलवारसहायक आयुक्त विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते. 

यावेळी शासकीय निवासी शाळा व वसतीगृहात राहून 85 ते 100 टक्के  गुण प्राप्त 12 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संबोधन ट्रस्टचे राज काचोळे व प्रशिक मेश्राम यांना व कार्यक्रमाला उपस्थित सर्व तृतीयपंथीय लाभार्थ्यांना साडीचोळी देवून सन्मानित करण्यात आले.

तृतीयपंथीय कार्यशाळेत हमसफर ट्रस्टचे आशु गोयल यांनी व निलोफर मॅडम यांनी तृतीयपंथीय कसा ओळखावात्यांची भावनिकमानसिक गरजा काय आहेत्या आळखून समाजातल्या सर्वसामान्य लोकांनी त्यांच्याशी कसा व्यवहार करावात्यांना काय अपेक्षित आहे. याबद्दल महत्व  समजावून सांगितले.

कार्यक्रमाचे  संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी  तर आभार समाज कल्याण निरीक्षक पुनम आसेगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनात समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडेस्मिता बहिरमवारश्वेता लक्कावारगणेश खोटेसंदिप वाढई. सूरज डांगेसंजय बन्सोडसजल कांबळेराबीया अलीचेतना खाडीलकरअमोल गोहणेराहुल आकुलवारउर्मिला केरझरकरसंतोष सिडामठाकरे मॅडमबार्टी चे सर्व समतादूत सर्व क्रिस्टल कर्मचारी शासकीय निवासी शाळा व वसतीगृहाचे गृहपाल व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्येने तृतीयपंथीय लाभार्थी  वृद्ध नागरिकशाळामहाविद्यालय व वसतिगृहाचे विद्यार्थी उपस्थित होते.

00000

Thursday, 26 June 2025

आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व्यक्ती / संस्थेकडून अर्ज आमंत्रित


आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व्यक्ती / संस्थेकडून अर्ज आमंत्रित

Ø अंतिम दिनांक जुलै 2025 पर्यंत

चंद्रपूरदि. 26 : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’   ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’  देण्यात येणार आहेचंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपुरबल्लारपुरराजुरागोंडपिपरीकोरपनाजिवतीमुलसावलीसिंदेवाहीपोंभुर्णा या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांच्याकडून 2023-24  2024-25 या वर्षाकरिता प्रस्ताव आमंत्रित आहेत.

सदर प्रस्ताव जुलै 2025 पर्यंत प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपुर येथे स्विकारण्यात येतीलविनामुल्य प्रस्तावाचा नमुना व आवश्यक सर्व माहितीसाठी कृपया प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००

15 जुन ते 31 जुलैपर्यंत सिकलसेल आजार जनजागृती अभियान


15 जुन ते 31 जुलैपर्यंत सिकलसेल आजार जनजागृती अभियान

          चंद्रपूरदि. 26 :   राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 15 जुन ते 31 जुलै पर्यंत चंद्रपुर जिल्ह्यात सिकलसेल आजार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहेयानिमित्त आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रमांचे  आयोजन करण्यात येत आहेअनुवंशिक आजार असलेल्या सिकलसेल आजाराचे रुग्ण प्रामुख्याने आदिवासी भागात आढळतातया आजारावर अद्यापही कोणताही कायमस्वरूपी उपचार नाहीया आजाराने बाधित रुग्ण व्यक्तींवर   जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्थास्तरावर मोफत औषधोपचार केले जातात. या आजाराचे संक्रमण पुढील पिढीत होऊ नये, यासाठी सिकलसेल आजार नियंत्रण जनजागृती उपक्रम राबविला जात आहे.

सदर उपक्रमामध्ये सिकलसेल आजाराची अचुक माहितीआजाराची लक्षणेप्रकारऔषधोपचारआजार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्येक गावात वैद्यकिय अधिकारीसमुदाय आरोग्य अधिकारीआशा स्वयंसेविका यांच्यामार्फत माहिती देणेआदिवासी आश्रम शाळाजिशाळा व महाविद्यालयात या आजाराबाबत जनजागृती करणेरॅलीचर्चासत्रकार्यशाळाव चाचणी शिबिराचे आयोजन करणेप्रसार माध्यमांतुन सिकलसेल आजार जनजागृतीतपासणी व औषधोपचाराबाबत माहिती प्रसारित करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सिकलसेल आजाराची तीव्रता : सिकलसेलग्रस्त रुग्णांना वारंवार रक्त संक्रमणाची गरज भासतेसिकलसेल वाहक स्त्री-पुरुषांचा आपसात विवाह झाल्यास त्यातून सिकलसेलग्रस्त रुग्ण किंवा वाहक मुल जन्माला येण्याची दाट शक्यता असतेत्यासाठी विवाहपुर्व सिकलसेलची चाचणी करून घेणे आवश्यक आहेतसेच अंतिम निदानासाठी HPLC तपासणी घ्यावी. जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्था स्तरावर  औषधोपचार व HPLC चाचणीची सोय उपलब्ध आहे. सर्व सिकलसेल आजारग्रस्त रुग्णांना प्रामुख्याने फॉलिक अॅसिडव्हिटॅमिन सी तसेच जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्था स्तरावरून हायड्रॉक्सियुरिया अशी  मोफत औषधे दिली जातात.

सिकलसेलग्रस्तांना सुविधा : या आजाराचे गांर्भीय लक्षात घेऊन सिकलसेलग्रस्त रुग्णांना अनेक शासकिय सुविधा देण्यात येतातसंजय गांधी निराधार योजनेतुन दरमहा 1500 रुपये मानधनदहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रति तास जादा 20 मिनिटेमोफत रक्त संक्रमण कार्डदिव्यांग प्रमाणपत्र युडीआयडी कार्डतसेच आवश्यकता असल्यास मोफत गर्भजल परिक्षण सुविधाउपचारासाठी एका मदतनीसासह मोफत बस प्रवासतसेच रेल्वे प्रवासात 50 टक्के सुट असा लाभ देण्यात येत आहे.

 प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सिकलसेल रुग्णांकरीता हिपरिप्लेसमेंटची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेयाचा लाभ जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

००००००

Wednesday, 25 June 2025

आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शन





आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे छायाचित्र प्रदर्शन

Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते उद्घाटन

Ø प्रशासकीय इमारत येथे 25 ते 28 जून पर्यंत नागरिकांसाठी खुले

चंद्रपूरदि. 25 : देशातील आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे आौचित्य साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे नागरिकांना अवलोकन व्हावेया उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयचंद्रपूरच्या वतीने चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शन प्रशासकीय इमारतीमध्ये दि. 25 ते 28 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहेया प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार,  जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

प्रदर्शनामध्ये समाविष्ट बाबी : पुरातन काळापासून भारतात सुरू असलेली लोकशाही व्यवस्थालोकशाही परंपरेनुसार यात असलेला लोकांचा सहभाग व दृष्टीकोणलोकशाहीचे तत्वभारतीय परंपरा आणि सामुहिक भागीदारीने चालविण्यात आलेले शासनग्रामीण आणि शहरी भागातील जमीन स्तरावरील लोकशाही व्यवस्थास्वतंत्र भारत आणि लोकशाही प्रणालीआणीबाणीपूर्व व पश्चात भारतीय समाजव्यवस्थाआणीबाणी लावल्यानंतर प्रसिध्द झालेले राजपत्रप्रसारमाध्यमांवरील निर्बंधसरकारच्या विरोधात जनआंदोलनआणीबाणी संपल्यानंतर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊलेचंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा आणीबाणी विरोधातील संघर्ष लढाआदींचा यात समावेश करण्यात आला आहे.

आणीबाणीधारकांना प्रमाणपत्राचे वाटप : आणीबाणीत तुरंगवास भोगलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेयात हेमंत वासुदेव डहाकेगिरीश वासुदेवराव अणेअनिल मधुकर अंदनकरसुधीर वसंतराव टिकेकरनारायण कृष्णराव पिंपळापुरेकृष्णा दत्तात्रय देशपांडे यांचा समावेश होता.

००००००

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 26 जून ते 4 जुलैदरम्यान विशेष मोहीम


 जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 26 जून ते 4 जुलैदरम्यान विशेष मोहीम

चंद्रपूर, दि. 25 : राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर मार्फत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 26 जून ते 4 जुलै या काळात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

सत्र 2025-26 मध्ये एमएचटी-सीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड, पीएचडी, बीएससी ॲग्री, बी.फार्म, बीएससी नर्सिंग इत्यादी सीईटी देऊन व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशित असणारे, ज्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे थेट व्दितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचे आहे, अशा उमेदवारांनी 26 जून ते 4 जुलै 2025 दरम्यान विशेष मोहिमेअंतर्गत आपला जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करावा. तसेच 12 वी विज्ञान शाखेतील सत्र 2025-26  मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठीसुध्दा या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणपत्र पडताळणी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपला रितसर, परिपुर्ण भरलेला अर्ज तात्काळ सादर करावा. तसेच या मोहिमेत त्रृटीपुर्तता करून घ्यावी. ज्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज दाखल केलेले आहे, परंतु अपुर्ण पुराव्याअभावी ज्यांची प्रकरणे त्रुटीमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या दिनांकास किंवा त्यापुर्वी आपण सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊन त्रुटीपुर्तता करून घ्यावी. जेणेकरून सत्र 2025-26 मधील प्रवेशप्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्राअभावी कुठल्याच मागासवर्गीयांना वंचित राहण्याची वेळ येणार नाही, असे समितीचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.

5 व 6 जुलै रोजी कारागृहातील दर्गा भाविकांसाठी खुला


 व जुलै रोजी कारागृहातील दर्गा भाविकांसाठी खुला

चंद्रपूर,दि 25 : चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात  पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांचे समाधीस्थळी दरवषीप्रमाणे यावर्षी  मोहर्रम सणानिमित्त व जुलै रोजी भाविकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

कारागृहात पुर्व प्रथेप्रमाणे उर्स (यात्राआयोजित करण्यात येत असल्याने समाधीच्या दर्शनाकरीता सर्व समाजातील भाविक दर्शनासाठी येत असतातत्यामुळे सदर कालावधीत कारागृहाच्या आतील समाधीच्या दर्शनाकरीता प्रवेश देण्यात येणार आहेकारागृहाचे आत कोणत्याही भाविकाला मोबाईल फोनकमेराखाद्यपदार्थ उदापेढेबर्फी  अथवा इतर खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आले आहे. तसे आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येईल. नियमांचे अनुपालन करूनच समाधीस्थळी दर्शनाकरीता यावे  व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कारागृहाचे प्रभारी अधिक्षक सतिश सोनवणे यांनी कळविले आहे.

००००००

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘जागतिक आलिम्पिक डे’

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक आलिम्पिक डे

            चंद्रपूर,दि 25 : जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलिम्पिक विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानूसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने जागतिक आलिम्पिक डे साजरा करण्यात आला. यावेळी  खेळाडूंची भव्य रॅली चंद्रपूर शहरात काढण्यात आलीबॅनर व स्लोगनसह असंख्य खेळाडूंनी या रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

      त्यानंतर जिल्हा क्रीडा संकूल येथे चर्चासत्रपरिसंवाद व कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेमुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड होतेयाप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरेजयश्री देवकर, संदीप उईके,  क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळेमनोज पंधराम, ,नंदु अवारे, मोरेश्वर गायकवाड, फुटबॉल प्रशिक्षक अभिषेक डोईफोडेखेलो इंडीया प्रशिक्षक रोशन भुजाडे आदी उपस्थित होते.

आलिंम्पिसाठी भारताचे स्वप्न व खेळाडूंची भूमिका यावर अविनाश पुंड यांनी मार्गदर्शन केलेकार्यकमाचे प्रास्ताविक संदीप उईके यांनीसंचालन मोरेश्वर गायकवाड यांनी तर आभार रोशन भुजाडे यांनी मानलेसंपूर्ण जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थाविविध सामाजिक संस्थाऔद्योगिक प्रतिष्ठाने यांच्याकडून जागतिक आलिम्पिक डे साजरा करण्यात आला.

००००००

Tuesday, 24 June 2025

वरोरा तालुक्यातील भूसंपादनाची प्रकरणे तातडीने निकाली काढा - राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर



 

वरोरा तालुक्यातील भूसंपादनाची प्रकरणे तातडीने निकाली काढा - राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर

Ø शेतकऱ्यांना आठ दिवसात आक्षेप नोंदवण्याच्या दिल्या सूचना

Ø रेल्वेच्या विविध कामांसाठी भूसंपादनाचे प्रकरण

नागपूरदि. 24 : चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील चार गावांमधील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय तातडीने मार्गी लावावा आणि संबंधित शेतकऱ्यांनी आठ दिवसाच्या आत लवादाकडे आक्षेप नोंदवावे तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नुकसान होणार नाही याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावीअशा सूचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आज येथे दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज श्री. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील माजरी एरिया अमलगमेटेड एकोणा 1 व 2 येथे रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅक बांधकामाच्या भूसंपादनाबाबत बैठक घेण्यात आली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरीचंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडाविभागीय आयुक्तालयातील अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णीचंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

माजरी एरिया अमलगमेटेड एकोणा 1 व 2 येथे रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅक बांधकामासाठी दहेगावनायगावचरूरखटी आणि निमसडा येथील शेतकऱ्यांची 27.24065 हेक्टर आर जमीन भूसंपादित करण्यात आली. मात्रशेतकऱ्यांना भूसंपादनापोटी योग्य मुल्यांकन मिळाले नसल्याची तक्रार आहे. याप्रकारणाबाबत श्री.अहीर यांनी शासन आणि शेतकऱ्यांचे मत समजून घेतले व आवश्यक माहिती यावेळी जाणून घेतली.

याप्रकरणात शासनाने नेमलेल्या लवादाने सखोल बाबींचा विचार करून निर्णय द्यावातसेच शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे हरकती व नोंदी सादर कराव्याअशा सूचना श्री. अहीर यांनी दिल्या. तसेच याभागात भूसंपादन होवून सुरू असलेले रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅकचे बांधकाम सद्या शेतीची पेरणी लक्षात घेता शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घेवून पार पाडावी,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

००००००

प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा कार्यक्रम स्थगित

 प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा कार्यक्रम स्थगित

चंद्रपूरदि. 24 : प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पालकमंत्री डॉअशोक उईके यांच्या व्यस्ततेमुळे स्थगित करण्यात आला. 25 जून रोजी मुंबईत अतिशय महत्वाच्या बैठकीला पालकमंत्री यांना उपस्थित राहावे लागणार असल्यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

25 जून रोजी सकाळी 10 वाजता प्रियदर्शीनी इंदिरा गांधी सभागृहचंद्रपुर येथे प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतामात्र हा कार्यक्रम आता नंतर घेण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

रेतीघाट लिलावाच्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन


 रेतीघाट लिलावाच्या अनुषंगाने अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 24 : जिल्ह्यातील सन 2025-26 या वर्षाकरीता वाळूगटांच्या राज्यस्तरीय (SEAC व SEIAA) पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्याकरीता अर्ज सादर करावयाचे आहेत. त्याकरीता जिल्ह्यातील वाळू गट निश्चित करण्यात आले असून उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल  तयार करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरणवने व वातावरण बदल मंत्रालयाने 25 जुलै 2018 मध्ये प्रसिध्द केलेल्या वाळू / रेती उत्खनन मार्गदशक सूचनेनुसार सदर अहवाल जनतेच्या माहितीकरीता व अभिप्राय नोंदविण्याकरीता https://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सदर अहवालातील रेती घाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने आपले अभिप्राय उपरोक्त https://chanda.nic.in संकेतस्थळावर व miningofficer.chanda@gmail.com वर नोंदवावेअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

००००००

26 जून रोजी आयटीआय मध्ये शिकाऊ /रोजगार भरती मेळावा


 26 जून रोजी आयटीआय मध्ये शिकाऊ /रोजगार भरती मेळावा

चंद्रपूरदि. 24 : शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चंद्रपूर येथे गुरुवार दि. 26 जून  रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय " शिकाऊ उमेदवारी मेळावा तसेच रोजगार मेळावा"आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्याआजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे.

शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. सदर मेळाव्याचे आयोजन बीटीआरआय चंद्रपूर यांच्या सहकार्याने होत असून याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी योगेश धवणे (9405912096) लोखंडे मॅडम (9423690138) यांच्याशी संपर्क साधावा,  असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. वानखेडे व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले.

 ००००००

Monday, 23 June 2025

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम


 पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम

Ø 25 जून रोजी प्रियदर्शनी सभागृह येथे आयोजन

चंद्रपूरदि. 23 : आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधांची परिपूर्णता सुनिश्चित करणेहा प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानचा प्रमुख उद्देश आहेया अभियानामध्ये शासनाच्या 17 विभागांच्या 25 सेवांचा समावेश करण्यात आला असून 25 जून रोजी पालकमंत्री डॉअशोक उईके यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत प्रत्यक्ष ग्रामस्तरावर शिबिरांच्या माध्यमातून आधारकार्डरेशनकार्डआयुष्मान भारतकार्डजातीचे प्रमाणपत्रपीएम-किसानजनधनखातेकाढणे अशा सेवा देण्यात येणार आहेतचंद्रपूर जिल्ह्यात या शिबिरांचे आयोजन दिनांक 15 ते 30 जून दरम्यान करण्यात येत आहेत्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून 25 जून रोजी सकाळी 10 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहचंद्रपुर येथे प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान जिल्हास्तरीय कार्यक्रम आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक ऊईकेयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

सदर कार्याक्रमास जिल्ह्यातील खासदारआमदार तसेच जिल्हाधिकारी व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेतजिल्हास्तरीय कार्यक्रमास सर्व आदिवासी सामाजिक संघटनासामाजिक कार्यकर्ते व आदिवासी बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००