Search This Blog

Monday, 16 June 2025

दिशा समितीच्या अंमलबजावणीचा खासदारांकडून आढावा



 दिशा समितीच्या अंमलबजावणीचा खासदारांकडून आढावा

चंद्रपूरदि. 16 : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेले विषय तसेच केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) कार्यरत आहे. या समितीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा खासदार धानोरकर यांनी आज (दि. 16) घेतला.

नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीला दिशा समितीचे सहअध्यक्ष खा. डॉ. नामदेव किरसान, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुटे व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्याप्रधानमंत्री पीक विमा योजनेत अनेक लाभार्थी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेतपात्र लाभार्थ्यांना पीक विम्याची रक्कम लवकर देण्यात यावीतसेच वाढीव किमतीने बीबियाणेखतांची विक्री होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून परवाने रद्द करावेजलजीवन मिशन मध्ये कंत्राटदारांनी सिमेंट काँक्रेटचे रस्ते फोडून टाकले आहेनागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहेत्यामुळे संबंधित कंत्राटदारांनी रस्त्याची डागडुजी करावीतसे आदेश संबंधित विभागाने कंत्राटदारांना द्यावेकुपोषण मुक्त जिल्ह्यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने प्रभावी योजना राबवाव्यातजिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम त्वरीत पूर्ण करावे.

घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध होत असली तरी रेतीघाटापासून वाहतुकीचा खर्च खुप जास्त येत आहेयाकडे प्रशासनाने लक्ष द्यावेमोबाईलची रेंज राहण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने टॉवरचे काम गतीने करावेवरोरा ते माजरी रेल्वे स्टेशन दरम्यान टाकण्यात येणा-या तिस-या रेल्वे लाईनचे काम भुसंपादनासाठी दिलेल्या जमिनीवरच करावेअतिरिक्त जागेवर काम करू नयेराष्ट्रीय महामार्गाचे काम करतांना कंत्राटदारांकडून रस्त्यावरील प्रवासी निवा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतेसदर प्रवासी निवारा कंत्राटदारांनी बांधून द्यावेवरोरा चिमूर महामार्ग अतिशय उंच असल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीशिवाय महामार्गावरील सर्व पाणी लगतच्या शेतात जात असल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहेयावर राष्ट्रीय महामार्ग आणि प्रशासनाने उपाययोजना करावीअशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी इतरही विषयांचा आढावा घेतला. बैठकीत खाडॉनामदेव किरसान यांनी आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीसुध्दा संबंधित विभागाला सुचना केल्यासंचालन आणि सादरीकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुडे यांनी केले.

या विषयांचा आढावा : दिशा समितीच्या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनारेल्वेराष्ट्रीय महामार्गखनीज विकासग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणदिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनाप्रधानमंत्री ग्राम सडक योजनामहानेटविशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनांचे अनुदानप्रधानमंत्री आवास योजनास्वच्छ भारत मिशनअमृत योजनाएकात्मिक बालविकास योजनाप्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनाप्रधानमंत्री उज्वला योजनाजलजीवन मिशनप्रधानमंत्री पीक विमा योजनाशिक्षण व इतर विषयांचा आढावा घेण्यात आला.

०००००००

No comments:

Post a Comment