Search This Blog

Friday, 27 June 2025

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड



 

विविध कंपन्यांतर्फे 70 विद्यार्थ्यांची निवड

Ø रोजगार मेळाव्यात 20 जणांना नियुक्तीपत्र प्रदान

चंद्रपूरदि. 27 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचंद्रपूर येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवारी रोजगार भरती मेळाव्यात 70 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 20 जणांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच प्राचार्य वैभव बोंगीरवार यांच्या मार्गदर्शनात मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्रचंद्रपूर द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकावू उमेदवारी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होतेया भरती मेळाव्याकरिता व्हेरॉक इंजिनिअरिंगधूत ट्रान्समिशनपटले प्लेसमेंट सर्विसेसस्पीक अँड स्पेन एज्युकेशन सोल्युशन्स लिमिटेडब्रह्मा इंजीनियरिंग अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडवैभव एंटरप्राइजेस अँड प्लेसमेंट सर्विसेस इत्यादी आस्थापनांनी सहभाग नोंदविलाया रोजगार भरती मेळाव्यात एकूण 260 विद्यर्थ्यांनी सहभाग नोंदविला

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य अधिकारी तथा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करण्याचे महत्त्व पटवून दिलेतसेच मेळाव्याद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचे आवाहन केलेनिवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याशिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याकरिता अप्रेंटिसशिप सेल तथा राईट वॉक फाउंडेशन चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे समन्वयक कपिल बांबोडे यांनी अप्रेंटिसशिपत्याचे फायदेनिवड प्रक्रिया आणि सॉफ्ट स्किल याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचालन योगेश धवणे यांनी केलेयावेळी कंपनी कोऑर्डीनेटर म्हणून विजय तांदळेमनोज पाटीलश्रीखोब्रागडे तसेच इतर समन्वयकबीटीआरआयच्या श्रीमती लोखंडेश्रीमहातो तसेच  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनदेशक श्रीनंदेश्वरनिमसरकारचांदेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment