Search This Blog

Monday, 16 June 2025

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज आमंत्रित

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज आमंत्रित

Ø अंतिम मुदत 25 जूनपर्यंत

              चंद्रपूरदि.16 :   सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वीपदवीपदव्युत्तरवैद्यकीय व अभियांत्रिकी इअभ्यासक्रमांमध्ये सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

मांगमातंगमिनिमादीगमादींगदानखनीमांगमांगमहाशीमदारीराधेमांगमांगगारूडीमांगगारोडीमादगीमादीगा या जातीतील विद्यार्थी विद्यार्थींना महामंडळाकडुन जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील पहिले तीन किंवा पाच विद्यार्थ्यांस उपलब्ध निधीच्या अधिन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातुन शिष्यवृत्ती मंजुर करण्यात येतेसंबंधितांनी 25 जून 2025 च्या आत सर्व कागदपत्रानिशी जिल्हा कार्यलयात संपर्क करून खालील प्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत

              1. जातीचा दाखला, 2. फोटो, 3. मार्कशीटशाळा सोडल्याचा दाखला,  4. राशनकार्ड, 5. उत्पन्नाचा दाखला, 6. आधारकार्ड, 7. बैंक पासबुक, 8. पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट व 9. जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इकागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,डॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे द्यावा तसेच याबाबत कार्यालयात संपर्क साधावा,

००००००

No comments:

Post a Comment