Search This Blog

Thursday, 5 June 2025

‘त्या’ दोन राईस मीलकडून उर्वरीत धान जमा करण्याची प्रक्रिया सुरू

 

त्या’ दोन राईस मीलकडून उर्वरीत धान जमा करण्याची प्रक्रिया सुरू

Ø जिल्हा मार्केटिंग अधिका-यांचे स्पष्टीकरण

               चंद्रपूर,दि. 5 जून :   सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य खरेदीपुरवठा साखळी व्यवस्थापनसाठवणुक क्षमताअन्नधान्याचे वितरण आदी बार्बीचा अभ्यास करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाचे उपसचिव व इतर अधिका-यांमार्फत 1 जून रोजी  कांपा (तानागभीड ) येथील गुप्ता राईस एक्सर्पोट व चांदतारा इंडियन स्टीम राईस इंडस्ट्रीज या मिलची तपासणी करण्यात आली आहे.

               शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत हंगाम 2024-25 मधील धान खरेदी करण्यात आलेल्या धान साठा पैकी गुप्ता राईस एक्सर्पोट या मिलधारकास 21099.92 क्विंटलचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या बीम पोर्टलद्वारे डिओ देण्यात आलेसदर डिओ पैकी प्रत्यक्षात 20373.68 क्विंटल धानाची उचल करून 726 क्विंटल घट वजा जाता पूर्ण डिओ बीम पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आले आहेप्रत्यक्ष उचल करण्यात आलेल्या धानाच्या 67 टक्के  प्रमाणे 13650.37 क्विंटल सीएमआर तयार होतेसदर सीएमआर पैकी 5206.60 क्विंटल धान शासकीय गोदामात जमा करण्यात आले आहे व उर्वरीत जमा करणे सुरू असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एसतिवाडे यांनी स्पष्ट केले आहे.

              तसेच चांदतारा इंडियन स्टीम राईस इंडस्ट्रीज या मिलधारकास 25057.60 क्विंटलचे शासनाच्या बीम पोर्टलद्वारे डिओ देण्यात आलेसदर डिओ पैकी प्रत्यक्षात 24560.97 क्विंटल धानाची उचल करून 496.63 क्विंटल घट वजा जाता पूर्ण डिओ बीम पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आले आहेप्रत्यक्ष उचल करण्यात आलेल्या धानाचे 67 टक्के प्रमाणे 16455.85 क्विंटल सीएमआर तयार होतेयापैकी 11282.10 क्विशासकीय गोदामात जमा करण्यात आले आहे व उर्वरीत जमा करणे सुरू आहेअसेही मार्केटिंग अधिकारी श्रीतिवाडे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment