Search This Blog

Sunday, 1 June 2025

चंद्रपूरात 'संडे ऑन सायकल' अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन


 चंद्रपूरात 'संडे ऑन सायकलअंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन

चंद्रपूरदि. 1 जून : राज्य शासन व युवक सेवा संचालनालय,  पुणे यांच्या 'खेलो इंडियाउपक्रमांतर्गत आणि साईमुंबईच्या निर्देशानुसार 'संडे ऑन सायकलउपक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. या अंतर्गत आज (दि. 1) सकाळी  चंद्रपूर शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

या रॅलीत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडतालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरेजयश्री देवकरक्रीडा अधिकारी मनोज पंधरामनंदू अवारेमोरेश्वर गायकवाडक्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळेसंदीप उईकेवरिष्ठ लिपिक रंजना शेवतकर व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीला हिरवा झेंडा दाखवून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी सुरुवात केली.

आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश

सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार असून यामुळे इंधन बचतप्रदूषण नियंत्रणआरोग्यवृद्धी आणि साहसवृत्तीचा विकास साधता येतो. फिटनेस का डोजअर्धा तास रोज’ या घोषवाक्याखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

सुमारे 10 किलोमीटर अंतराच्या या रॅलीत जनजागृतीपर घोषणांचा समावेश होता. या यशस्वी उपक्रमासाठी क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळेसंदीप उईकेक्रीडा अधिकारी मनोज पंधरामनंदू अवारेमोरेश्वर गायकवाड व मानधन कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. खेलो इंडिया चे प्रशिक्षक रोशन भूजाडे यांचे या उपक्रमात मोलाचे सहकार्य लाभले.

00000000

No comments:

Post a Comment