Search This Blog

Wednesday, 18 June 2025

पीक कर्ज वाटपाच्या सुलभतेसाठी नागरी मदत केंद्र


पीक कर्ज वाटपाच्या सुलभतेसाठी नागरी मदत केंद्र

Ø तालुक्यातील शेतक-यांनी संपर्क करण्याचे चंद्रपूर तहसीलदारांचे आवाहन

चंद्रपूर,दि. 18 : जिल्ह्यात खरीप हंगाम - 2025 मध्ये कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहु नयेया उद्देशाने 16 ते 22 जून या कालावधीत पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी दिले आहेतत्या अनुषंगाने शेतक-यांची गैरसोय टाळण्याकरीता चंद्रपूर तहसील कार्यालयाचे मदत क्रमांक  सहनिबंधक ए.आर तुपट  (मो. 8530811366) आणि 7522900846 या क्रमांकावर तक्रार नोंदवावीअसे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.

पीक कर्ज वाटप करण्यासाठी  बँक आणि संलग्न विभाग यांच्या समन्वयाने प्रत्येक बँकेत 16 ते 22 जून या कालावधीत रोज सकाळी 11 ते सायंकाळी या वेळेत कर्ज वाटप कॅम्पचे नियोजन करण्यांत आले आहेत्याकरीता तालुक्यातील तसेच मेळाव्याचे पर्यवेक्षण करण्यासाठी महसुल अधिकारीकृषी अधिकारीग्राम विकास अधिकारीआणि सहकार विभागाचे (बैंकक्षेत्रीय अधिकारी यांच्या नोडल म्हणुन नेमणूका करण्यात आल्या आहेत.

               पीक कर्ज घेण्याकरीता शेतकऱ्यांनी सोबत- 7/12, 8आधार कार्डपॅन कार्ड, 2 रंगीत पासपोर्ट फोटोबँक पासबुक प्रत,  कर्ज नसल्याचे (ना हरकतप्रमापणपत्र आणि स्वंयघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहेशेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याकरीता व मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज वितरीत करण्याकरीता चंद्रपूर तहसील कार्यालयाकडून नागरी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेतरी चंद्रपूर तालुक्यातील शेतक-यांनी वर नमुद क्रमांकावर संपर्क करावाअसे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment