Search This Blog

Saturday, 21 June 2025

प्रशिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे





 

प्रशिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

चंद्रपूरदि. 21 : पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती व इतर आपत्ती वेळी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावीयाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच चंद्रपूर तालुका प्रशासनाच्या वतीने लोहारा येथील तलावावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारेउपविभागीय अधिकारी संजय पवारतहसीलदार विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी नागरिकांना सीपीआरनैसर्गिक आपत्तीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. सदर प्रशिक्षणाचा लाभ गावातील नागरीक तसेच तालुक्यातील पोलीस पाटीलइतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीसरपंचतलाठीमंडळ अधिकारीकोतवालग्रामसेवककृषी सहायकआशा सेवकिाआपदा मित्रआपदा सखीपट्टीचे पोहणारे नागरिक यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख व त्यांच्या टीमने सहकार्य केले.

000000

No comments:

Post a Comment