Search This Blog

Tuesday, 17 June 2025

मध्यस्थांपासून उमेदवारांनी सावध रहावे

 मध्यस्थांपासून उमेदवारांनी सावध रहावे

Ø नोंदणी व मुद्रांक विभागातील  'गट-संवर्गातील पद भरती

           चंद्रपूर,दि. 17 : नोंदणी व मुद्रांक विभागातील  शिपाई 'गट-संवर्गातील 284 पदभरती करीता 22 एप्रिल 2025 रोजी  वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होतीसदर भरती प्रक्रिया पूण करणेऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे तसेच ऑनलाईन पध्दतीने परिक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शनकंपनीस नियुक्त केले आहेत्यानुसार आय.बी.पी.एसकडून 22 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून घेण्यात आले आहेत.

आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेसदर परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एसकडून पाठविण्यात येणार आहे.

            सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाहीजर याबाबत कोणती व्यक्त्तीसंस्थेकडूनमध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावेअसे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र विनवडे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment