Search This Blog

Thursday, 26 June 2025

आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व्यक्ती / संस्थेकडून अर्ज आमंत्रित


आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व्यक्ती / संस्थेकडून अर्ज आमंत्रित

Ø अंतिम दिनांक जुलै 2025 पर्यंत

चंद्रपूरदि. 26 : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’   ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’  देण्यात येणार आहेचंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपुरबल्लारपुरराजुरागोंडपिपरीकोरपनाजिवतीमुलसावलीसिंदेवाहीपोंभुर्णा या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांच्याकडून 2023-24  2024-25 या वर्षाकरिता प्रस्ताव आमंत्रित आहेत.

सदर प्रस्ताव जुलै 2025 पर्यंत प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपुर येथे स्विकारण्यात येतीलविनामुल्य प्रस्तावाचा नमुना व आवश्यक सर्व माहितीसाठी कृपया प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment